संवेदना प्रकल्पामध्ये योग चिकित्सा व मर्म थेरपी या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली
संवेदना प्रकल्पामध्ये योग चिकित्सा व मर्म थेरपी या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली
दि. 10 मार्च 2019 रोजी संवेदना प्रकल्पामध्ये योग चिकित्सा व मर्म थेरपी या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. मानवतेच्या दु:खांना मुक्त करण्यासाठी प्राचीन विज्ञानाद्वारे योग चिकित्सा व मर्म थेरपी या विषयाचा उपयोग करवुन घेतला पाहिजे- श्री चंद्रमोहन भंडारी
आदरणीय चंद्रमोहनजी आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त योग दुत आहेत. पूर्व राजदुत (पोलंड, दुबई, कँनडा) येथे कार्यरत होते. अलमोडा- उत्तराखंड येथे त्यांचे या विषयावरील प्रशिक्षण केंद्र आहे. यांच्यासोबत उद्योजक श्री विजयजी पापरीवाले- मुंबई यांचे सहकार्य मिळाले. यावेळी श्री अभय शहा यांची उपस्थिती होती. या कार्यशाळेला शिक्षक, पालक, दिव्यांग मुले उपस्थित होते.