मा. आयुक्त, अपंग कल्याण विभाग पुणे यांची संवेदना प्रकल्पामध्ये शिवजयंती साजरी
मा. आयुक्त, अपंग कल्याण विभाग पुणे यांची संवेदना प्रकल्पामध्ये शिवजयंती साजरी
..
आज दि. 19.2.2019 रोजी मा. आयुक्त श्री. बालाजी मंजुळे साहेब (भा.प्र.से) - अपंग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी संवेदना शाळेस सदिच्छा भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमीत्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. यावेळी छ. शिवरायांच्या कार्याची महती व्यक्त केली. संवेदना प्रकल्पातील कार्य हे वंचितांसाठी कार्य आहे, बहुविकलांग मुलांच्या पालकांसाठी इथे देण्यात येणारे प्रशिक्षण अत्यंत महत्वपूर्ण आहे. या प्रकल्पातील कार्य व परिसर पाहून मला मनापासून आनंद वाटला. यावेळी जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्री. शिवानंद मिनगीरे साहेब, शाळेचे कर्मचारी उपस्थित होते.