आज दि. 21 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी 11 वाजता प्रशिक्षण वर्गाचा समारोप संपन्न झाला. समारोपासाठी नागपूर सी.आर.सी केंद्राचे थेरपीस्ट, चाईल्ड न्युरो फिजीशियन डॉ. प्रशांत उटगे, मिरागी नेत्रालयाचे प्रमुख रोटरीचे माजी प्रांतपाल श्री. विजयभाऊ राठी, यांच्या मार्गदर्शनाने झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूर येथील जेष्ठ बालरोगतज्ञ डॉ. मन्मथ भातांब्रे होते. मुलांचा व मातेचा आहार याविषयी उपयुक्त माहिती दिली. या वेळी पालक सौ.श्री. विशाल बन, श्री. विरभद्र बैनगीरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन व्यंकट लामजणे, प्रास्ताविक सौ. मयुरी बिल्लावार व आभार सौ. जयश्री माने यांनी व्यक्त केले.