संवेदना बहुविकलांग मुलांची शाळा ही श्रेष्ठ संस्था पाहून मी अत्यंतीक समाधानी झालो - मा.श्री. सी. विद्यासागर राव, राज्यपाल, महाराष्ट्र राज्य
संवेदना बहुविकलांग मुलांची शाळा ही श्रेष्ठ संस्था पाहून मी अत्यंतीक समाधानी झालो - मा.श्री. सी. विद्यासागर राव, राज्यपाल, महाराष्ट्र राज्य
संवेदना सेरेब्रल पाल्सी विकसन केंद्रास महाराष्ट्राचे मा. राज्यपाल सी विद्यासागरजी राव यांनी आज दि. 16 ऑक्टोबर 2018 रोजी भेट दिली. भेटीदरम्यान संवेदना शाळेतील फिजीओथेरपी विभाग, ऑक्युपेशनल थेरपी विभाग, स्पीच थेरपी विभाग, विशेष शिक्षण, न्युरॉलॉजी या विभागाची पाहणी मा. राज्यपाल महोदयांनी केली. प्रकल्प कार्यवाह श्री. सुरेश पाटील यांनी प्रकल्पाची माहिती दिली.
केंद्र शासनाच्या अलीमको या कंपनीकडून शाळेतील कु. नम्रता धीरज सोनवणे हिला रोलेटर व कु. मयुरी मनोज पाटील हिला विशेष सेरेब्रल पाल्सी चेअरचे वितरण मा. राज्यपाल महोदयांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी व्यासपीठावर मा.ना.संभाजीराव पाटील निलंगेकर, पालकमंत्री, लातूर, मा.खासदार सुनिलजी गायकवाड, रा.स्व.संघ जनकल्याण समितीचे प्रांत अध्यक्ष डॉ.श्री. रविंद्रजी साताळकर, संवेदना प्रकल्प अध्यक्ष अँड. जगन्नाथ चिताडे, शालेय समिती अध्यक्ष श्री. प्र.मा. जोशी, मुख्याध्यापिका सौ. दीपा पाटील, मा. राज्यपाल महोदयांनी प्रकल्पास शुभेच्छा दिल्या व संवेदना ही श्रेष्ठ संस्था पाहून मी अत्यंतीक समाधानी झालो असे नमुद केले. कार्यक्रमास श्री.डॉ. अशोक कुकडे, गावचे सरपंच श्री. सुर्यकांत सुडे, श्री. संतोष शेळके, डॉ. नितीन सास्तुरकर, डॉ.प्रदिप शहा, डॉ.योगेश निटुरकर, डॉ. देवाशिष रुईकर, श्री. अतुल ठोंबरे, श्री. वसंत नायगावकर व श्री. अरुण डंके, क्लिनीकल सायकॉलॉजीस्ट डॉ. नितीन आळंदकर यांच्यासह प्रशासनातील वरीष्ठ अधिकारी कर्मचारी, विशेष दिव्यांग विद्यार्थी, पालक, विशेष शिक्षक, थेरपीस्ट, नागरिक यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन श्री. व्यंकट लामजणे यांनी केले.