‘संवेदना’ बहुविकलांग मुलांच्या शाळेमध्ये जागतिक सेरेब्रल पाल्सी दिन साजरा
‘संवेदना’ बहुविकलांग मुलांच्या शाळेमध्ये जागतिक सेरेब्रल पाल्सी दिन साजरा
आज दि. 6 ऑक्टोबर 2018 रोजी संवेदना प्रकल्पामध्ये सेरेब्रल पाल्सी मुलांचा फार्मसी व होमिओपँथी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून सन्मान करण्यात आला. शाल, पुष्पगुच्छ देवून सर्वांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी श्री. रामेश्वर नाईक, (आरोग्य दुत स्वीय सहाय्यक, मा.श्री.गिरीषजी महाजन, वैद्यकीय शिक्षण मंत्री), श्री. संजय कोळगणे, जिल्हा नियोजन अधिकारी, लातूर, श्री. रेड्डी, उपकार्यकारी अभियंता, महावितरण कं. मर्या, शालेय समितीचे अध्यक्ष श्री. प्र.मा.जोशी, खोलेश्वर प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. राठोड, संवेदना प्रकल्प कार्यवाह श्री. सुरेश पाटील, डॉ. योगेश निटुरकर, श्री. बस्वराज पैके, फार्मसी व होमिओपँथी महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक, पालक उपस्थित होते.