'संवेदना' प्रकल्पामध्ये लातूर जिल्ह्यातील दिव्यांगांची नोंदणी कारण्याबाबतीत कार्यशाळा आयोजित
'संवेदना' प्रकल्पामध्ये लातूर जिल्ह्यातील दिव्यांगांची नोंदणी कारण्याबाबतीत कार्यशाळा आयोजित
दि. 17, 18 जुलै 2018 या दिवशी 'संवेदना' प्रकल्पामध्ये लातूर जिल्ह्यातील दिव्यांगांची नोंदणी कारण्याबाबतीत कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे. या कार्यशाळेत सहाय्यक गटविकास अधिकारी, विस्तार अधिकरी पंचायत समिती, ग्रामसेवक, डाटा एन्ट्री ऑपरेटर असे दि. 17 रोजी 530 कर्मचारी उपस्थित होते. (लातूर, रेणापूर, औसा, निलंगा, उदगीर, देवणी)
या कार्यशाळेच्या उदघाटन सत्रामध्ये जि.प. चे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, समाजकल्याण सभापती, बांधकाम सभापती, अति. मु.का.अ. जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांची उपस्थिती होती. श्री अरविंदराव पाटील निलंगेकर यांनी उपस्थिताना दिव्यांगांच्या नोंदणी बाबतीत संवेदनशीलपणे कार्य करण्याचे आवाहन केले. जेणेकरून भविष्यात ग्रामीण भागातील दिव्यांगांकरिता अधिकाधिक सेवा देता येऊ शकेल.