'संवेदना' प्रकल्पामध्ये CRE (Continuous Rehabilitation Education -निरंतर पुनर्वसन शिक्षण) शिक्षकांसाठीचे प्रशिक्षण संपन्न झाले
'संवेदना' प्रकल्पामध्ये CRE (Continuous Rehabilitation Education -निरंतर पुनर्वसन शिक्षण) शिक्षकांसाठीचे प्रशिक्षण संपन्न झाले
'संवेदना' प्रकल्पामध्ये दि. 18 मे ते 22 मे 2018 या कालावधीत CRE (Continuous Rehabilitation Education -निरंतर पुनर्वसन शिक्षण) शिक्षकांसाठीचे प्रशिक्षण संपन्न झाले. 'पूर्व व्यवसायिक व व्यवसायिक शिक्षण' या विषयावर शिक्षकांची कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत प्रा. श्रीनिवासन - सिकंदराबाद, प्रा. रविप्रकाश - नवी मुंबई, श्री. नितीन आळंदकर (क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट), श्री. सुधाकरराव घारापूरकर, डॉ. अंजली सावरगावकर, सौ. लिला करवा, सौ. अनघा अंधोरीकर, सौ. उमा व्यास यांचे विविध विषयावर विवेचन झाले. दिव्यांगांसाठी विशेष कार्य करणाऱ्या दोन उपक्रमाची माहिती स्वाधार अंध- अपंग स्वयंरोजगार प्रशिक्षण व पुनर्वसन केंद्र बुधडा व जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र नदीहत्तरगा येथे भेट दिली.