स्थानिक स्तर समिती लातूर जिल्ह्याची बैठक संपन्न झाली
स्थानिक स्तर समिती लातूर जिल्ह्याची बैठक संपन्न झाली
स्थानिक स्तर समिती लातूर जिल्ह्याची बैठक संपन्न झाली. मा.जिल्हाधिकारी तथा मा. अध्यक्ष स्थानिक स्तर समिती लातूर ची बैठक शुक्रवार दि. 25/ 11/2022 रोजी मा. जिल्हाधिकारी श्री. डाॅ. पृथ्वीराज बी.पी.यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीत समितीचे सदस्य डॉ.श्री बाळासाहेब चव्हाण संस्था प्रतिनिधी श्री सुरेश पाटील जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर एल.एस देशमुख,जि. सरकारी वकील अॅड.संतोष देशपांडे जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री संतोष नाईकवाडे अप्पर पोलीस अधीक्षक श्री अजय देवरे उपस्थित होते बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग व्यक्तींना कायदेशीर पालकत्वाच्या अर्जाची पूर्तता करणे ,जानेवारी 2023 मध्ये लातूर ,निलंगा ,उदगीर, अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयात मतिमंद ,बहु विकलांग, आत्ममग्न व सेरेब्रल पाल्सी या दिव्यांग प्रवर्गातील फिट्स येणाऱ्या मुलांचे मोफत वैद्यकीय उपचार शिबिर आयोजित करण्याचे निश्चित झाले. या प्रवर्गातील 18 वर्षावरील पालकत्व घेतलेल्या दिव्यांग व्यक्तींना स्वतंत्र रेशन कार्ड देण्याचा विचार करण्यात आला.जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने पालकांची कार्यशाळा आयोजित करण्याचे निश्चित झाले. जिल्हा परिषद, समाज कल्याण विभाग यांनी लातूर जिल्ह्यातील मतिमंद मुलांचे निरामय आरोग्य विमा योजनेचा हप्ता भरल्याबद्दल लातूर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे बैठकीत