जिल्हा विधी व न्याय प्राधिकरण, लातूर व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र ,लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या शासकीय योजना बाबत जिल्हा विधी व न्याय प्राधिकरण यांच्या कार्यालयात कार्यशाळा संपन्न झाली
जिल्हा विधी व न्याय प्राधिकरण, लातूर व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र ,लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या शासकीय योजना बाबत जिल्हा विधी व न्याय प्राधिकरण यांच्या कार्यालयात कार्यशाळा संपन्न झाली
दि.२१/१०/२०२२ रोजी जिल्हा विधी व न्याय प्राधिकरण, लातूर व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र ,लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या शासकीय योजना बाबत जिल्हा विधी व न्याय प्राधिकरण यांच्या कार्यालयात कार्यशाळा संपन्न झाली.प्रारंभी मा.न्यायाधीश श्रीमती स्वाती अवसेकर मॅडम (मा.सचिव विधी व न्याय प्राधिकरण लातुर जिल्हा) यांनी या कार्यालयातुन चालणार्या विविध उपक्रमाची माहिती दिली.कायदे व न्याय व्यस्थेची माहिती सामान्य लोकांना व्हावी. जेणेकरून समाजातील वंचित, दिव्यांग, आणि अन्यायग्रस्त व्यक्तीना न्याय मिळावा. याचाच भाग म्हणुन दिव्यांगासाठी शासनाच्या योजना व ते प्राप्त करून घेण्यासाडी काय करावे याची प्रक्रिया आज आपण जाणुन घेणार आहोत.संवेदना प्रकल्पातील विशेष शिक्षक तथा स्नॅक महाराष्ट्र चे समन्वयक श्री व्यंकट लामजने यांनी दिव्यांनी व्यक्ती साठी असलेल्या युडीआयडी कार्ड, निरामय आरोग्य विमा योजना, शिष्यवृत्ती योजना, 5 टक्के दिव्यांग निधी, समाजकल्याण विभागाच्या योजना, केंद्र व राज्य शासनाच्या विविध शासकीय योजना बाबत दिव्यांग व्यक्तींना विस्तृत माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अॅड. तौफीक तांबोळी यांनी केले. तर आभार अॅड.अविनाश मालवे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे श्री. बस्वराज पैके, दिव्याग स्नेह बंध, अपंग प्रतिष्ठान, सक्षम लातुर या संस्थेचे कार्यकर्ते श्री इस्माईल शेख, श्री. अमोल गव्हाणे, श्रीमती ज्योती मारडेकर , श्रीमतीसुनिता आयरेकर व कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.