घरोंदामधील दिव्यांगांनी दीपावली निमित्ताने आकर्षक पणत्यांची प्रदर्शनी व विक्री
घरोंदामधील दिव्यांगांनी दीपावली निमित्ताने आकर्षक पणत्यांची प्रदर्शनी व विक्री
रा स्व संघ जनकल्याण समिती (महाराष्ट्र प्रांत) संचलित, संवेदना प्रकल्पाचा 18 वर्षांपुढील बुद्धिबाधित दिव्यांगांसाठी निवासी पुनर्वसन व व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र नदीहत्तरगा येथे
जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र, (घरोंदा) या नावाने राष्ट्रीय न्यास, नवी दिल्ली, भारत सरकारची योजना राबविण्यात येते. सौ दीपाली देशमुख (विशेष शिक्षक व व्यावसायिक प्रशिक्षक), श्री सचिन जाधवर (विशेष शिक्षक), श्रीबस्वराज पैके (व्यवस्थापक) यांच्या मार्गदर्शनाखाली घरोंदामधील दिव्यांगांनी दीपावली निमित्ताने आकर्षक पणत्या तयार केल्या व त्याची प्रदर्शनी व विक्री पॉलिटेक्निक क्रीडासंकुल येथे स्टॉल लावण्यात आला होता. या दिव्यांग मुलांच्या कलाकृतीच्या प्रदर्शनाला लातूरकरांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला व सर्व पणत्या 3 दिवसांमध्ये विक्री झाल्या. ह्या उपक्रमामध्ये पालक श्री अतुल कुलकर्णी व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे स्थानिक समिती सदस्य श्री सुरज बाजुळगे यांचे सहकार्य लाभले. शेवटच्या 7 पणत्या आज श्रीमती वैशाली निटूरकर (आई) व कु अनघा निटूरकर (मुलगी) यांनी विकत घेतल्या.