संवेदना' शाळेतील पालकांचा स्नेह मेळावा संपन्न झाला
संवेदना' शाळेतील पालकांचा स्नेह मेळावा संपन्न झाला
आज दि. 30 मार्च 2018 रोजी 'संवेदना' शाळेतील पालकांचा स्नेह मेळावा संपन्न झाला. या कार्यक्रमांसाठी प्रमुख पाहुणे मा. शरदभाऊ खाडिलकर संघठन मंत्री रा.स्व. संघ जनकल्याण समिती यांची उपस्थिती होती. पालकांचे खेळ, डान्स थेरपी, पालक बैठक हे विषय मेळाव्यात घेण्यात आले. तसेच राज्यस्तरिय क्रीडा स्पर्धेत नैपुण्य मिळवलेल्या खेळाडूंचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.पालक मेळाव्यात मा. विपीनजी इटनकर (भा.प्र.से.) मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर व मा. शिवानंद मिनगिरे जिल्हा समाज कल्याण अधिकारी लातूर यांनी भेट देऊन पालकांना मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या.यावेळी प्रकल्प अध्यक्ष अॅड जगन्नाथ चिताडे व शालेय समिती अध्यक्ष श्री प्रभाकरराव जोशी होते