"सक्षम "देवगिरी प्रांत व स्नॅक, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग विषयावर कार्यशाळा
"सक्षम "देवगिरी प्रांत व स्नॅक, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग विषयावर कार्यशाळा
"सक्षम "देवगिरी प्रांत व स्नॅक (स्टेट नोडल एजन्सी सेंटर- "संवेदना " प्रकल्प लातुर),महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग विषयावर कार्यशाळा संपन्न. रविवार दि. 9 ऑक्टोबर 2022 रोजी कन्या प्रशाला पैठण, जि. संभाजीनगर येथे दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. विशेषता: बुद्धिबाधीत- सेरेब्रल पाल्सी दिव्यांग मुलांसाठी थेरपी, विशेष शिक्षण, निरामय कार्ड, कायदेशीर पालकत्वाचे प्रमाणपत्र या विषयावर मार्गदर्शन झाले. "सक्षम "नागपूर या संघटनेची माहिती राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्रा. डॉ. प्रीती पोहेकर (शाहू महाविद्यालय लातूर) यांनी करून दिली. दिव्यांगामधील सर्व प्रवर्गासाठीआणि देशभरातील सर्व राज्यात कार्य करणारे, राष्ट्रीय संघटन आहे. दिव्यांग सेवा केंद्र हे ठीक ठिकाणी सुरू करावयाचा उपक्रम आहे. समाजातील सर्वांनी दिव्यांग पुनर्वसन कार्यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. दिव्यांग व्यक्तींची समस्या, ही केवळ दिव्यांग व्यक्तींची किंवा त्यांच्या कुटुंबीयांची आहे, असे न समजता, ती आपल्या सर्वांची समस्या समजून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे हे सर्वांचे कर्तव्य असल्याची जाणीव करून दिली. बौद्धिक दृष्ट्या दिव्यांग मुलांसाठी निरामय कार्ड व शासनाच्या विविध योजनांची माहिती श्री व्यंकट लामजने (समन्वयक स्नॅक) यांनी करून दिली. या कार्यशाळेच्या आयोजनासाठी जिल्हा परिषदचे शिक्षक श्री. राहुल येरटे, डॉ. राम लोंढे (माऊली हॉस्पिटल, पैठण) श्री. भास्कर कुलकर्णी (मुख्याध्यापक, आर्य चाणक्य विद्या मंदिर, पैठण) श्री. फलके सर (मुख्याध्यापक, शालीवाहन विद्यालय, पैठण) श्रीमती रेखाताई कुलकर्णी, श्री किशोर चव्हाण, प्रहार अपंग संघटनेचे शिवाजीराव गाडे,गोविंदप्पा डांगे, संघाचे मा.जि.संघचालक श्री अॅड. राजेंद्र गोर्डे,अन् कार्यकर्ते, पालक, दिव्यांग व्यक्ती यांचे योगदान राहिले. या कार्यक्रमासाठी कन्या प्रशालेचा हाॅल मुख्याध्यापक श्री बजरंग काळे यांनी उपलब्द करून दिले.