"संवेदना" प्रकल्पामध्ये ऑक्यूपेश्नल थेरपि शिबिर संपन्न झाले
"संवेदना" प्रकल्पामध्ये ऑक्यूपेश्नल थेरपि शिबिर संपन्न झाले
"संवेदना" प्रकल्पामध्ये ऑक्यूपेश्नल थेरपि शिबिर संपन्न झाले. दि. 7 व 8 ऑक्टोबर 2022 रोजी संवेदना बहु विकलांग मुलांची शाळा , हरंगुळ (बु.) लातूर येथे टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई,बा. य.ल.नायर धर्मादाय रुग्णालय मुंबई , यांच्या सहकार्याने लातूर व परिसरातील बौद्धिक दृष्ट्या दिव्यांग मुलांसाठी निशुल्क ऑक्युपेश्नल थेरपि शिबिर संपन्न झाले .यासाठी नायर हॉस्पिटल मुंबईचे डॉ. हर्ष जहागिरदार,डॉ. नीतू वरदानी, डॉ. प्रिन्सि,डॉ वैभवी दोड, यानी दिव्यांग मुलांची थेरपी घेतली. प्रत्येक मुलांची वैयक्तिक तपासणी, उपचार व पालकांचे समुपदेशन झाले . 80 दिव्यांग मुले व त्यांचे पालक उपस्थित होते. वयोगटा नुसार गटश: उपक्रमाची तासिका झाली. दिव्यांग मुलांचे घरामध्ये शाळेत विविध कौशल्य कसे विकसित करायचे ,याचे प्रात्यक्षिकासह प्रयोग दाखविण्यात आले. याचा चांगला उपयोग पालकांसाठी आणि विशेष शिक्षकांसाठी झाला.