सह्याद्री परिवार व स्नॅक महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसांची बैठक/ कार्यशाळेचे आयोजन
सह्याद्री परिवार व स्नॅक महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसांची बैठक/ कार्यशाळेचे आयोजन
सह्याद्री परिवार व स्नॅक महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 24,25 सप्टेंबर रोजी संवेदना प्रकल्प, हरंगुळ (बु) लातूर, येथे दोन दिवसांची बैठक/ कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती. या मध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध पालक संस्थांचे प्रतिनिधी सह्याद्री परिवाराचे कार्यकारी मंडळ उपस्थित होते. या साठी पालक संस्थांचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर श्री. श्रीरंगजी बिजुरे, पुणे (केंद्रीय राज्य सल्लागार समितीचे सदस्य) सह्याद्री परिवारचे नूतन अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम बुर्डे, मुंबई पूर्व अध्यक्षा श्री. प्रकाश भळगट(सातारा) श्री. भाल कोटगावकर(पुणे), श्री चंद्रकांत शाह, दशरथ परब(पनवेल), श्री बद्रीप्रसाद राठी(संभाजीनगर), श्री. सुभाष रावळ(पुणे), श्रीमती ओलीवा डिसुजा (रायगड), श्री. सतीश धुरथ(ठाणे), श्री. अभय दिवे(नागपूर), श्री विकास खळतकर(नागपूर), श्री. सुरेश पाटील(लातूर). डॉ. चंद्रशेखर देसाई(पुणे), सौ. सुमित्रा येडले(लातूर) श्री. दयानंद अपशेट्टी(लातूर), प्रा. स्मिता शेट्टी(पुणे), श्री. अनिरुद्ध तोडकर(पुणे), श्री. संतोष मुंडे(पुणे), श्री. रामेश्वर पुंडीपल्ले(पुणे), श्री. दिलीप रेडकर(रत्नागिरी) यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत प्रत्येक जिल्ह्यात पालकांचे गट स्थापन करणे, निरामय आरोग्य विमा योजना, कायदेशीर पालकांचे महत्व, जिल्हा स्थानिक स्तर समितीचे गठन करणे, या विषयावर चर्चा झाली. महाराष्ट्र राज्यात अधिकाधिक निरामय कार्ड काढणे, स्थानिक स्वराज्य संस्था मधील 5% दिव्यांग कल्याण निधी मधून विमा हप्ता भरणे या विषयाचे बैठकीत नियोजन करण्यात आले.