दि.14 सप्टेंबर 22 या दिवशी स्नॅक( स्टेट नोडल एजन्सी संवेदना प्रकल्प ) व अस्तित्व संस्था डोबंवली यांच्या वतीने पालक व विशेष शिक्षक यांची कार्यशाळा अस्तित्व मतिमंद व कर्णबधीर मुलांचे पुनर्वसन केंद्र, पेंढारकर महाविद्यालय जवळ डोबंवली पूर्व येथे झाली. या कार्यशाळेत स्नॅक समन्वयक श्री व्यकंट लामजने यांनी राष्ट्रीय न्यास च्या विविध योजनांची ओळख करून दिली. निरामय आरोग्य विमा योजनेचे महत्व पालकांना अवगत करून दिले.या प्रसंगी संवेदना प्रकल्प समातीचे सदस्य श्री राहुल देशपांडे व अस्तित्व संस्थेच्या सचिव श्रीमती राधिका गुप्ते मॅडम, मतिमंद व कर्णबधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक, कार्यशाळेचे व्यवस्थापक, थेरपीस्ट, विशेष शिक्षक उपस्थित होते.