लातूर नगरीचा मानाचा शेवटचा गणपती श्री. औसा हनुमान गणेश सांस्कृतिक मंडळ, लातूर यांनी या वर्षी रा.स्व.संघ जनकल्याण समिती संचलित, संवेदना प्रकल्पाच्या कार्यामुळे प्रकल्प कार्यवाह श्री. सुरेशदादा पाटील यांचा सन्मान दि. 7 सप्टेंबर 2022 रोजी वीरशैव समाज सांस्कृतिक भवन, खंडोबा गल्ली, लातूर येथे करण्यात आला. श्री. औसा हनुमान गणेश सांस्कृतिक मंडळाचा सामाजिक बांधिलकीचा हा स्तुत्य उपक्रम आहे. समाजातील वंचित, दुर्लक्षित असलेल्या दिव्यांग व्यक्तीकरिता चालणाऱ्या कार्याची दखल घेवून संवेदना प्रकल्पाचा गौरव करण्यात आला आहे. श्री. औसा हनुमान गणेश सांस्कृतिक मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य यांचा संवेदना प्रकल्प आभार प्रकट करत आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. बी.व्ही. मोतीपवळे, स्वागताध्यक्ष डॉ. संजय वारद, ट्रस्टचे अध्यक्ष श्री. उदयकुमार चवंडा, श्री. औसा हनुमान गणेश मंडळाचे अध्यक्ष श्री. विलास गोंदकर होते.