दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्था,मतीमंद प्रवर्गातील शाळांचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षा अभियान मध्ये कार्यरत विशेष शिक्षकांची कार्यशाळा
दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्था,मतीमंद प्रवर्गातील शाळांचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षा अभियान मध्ये कार्यरत विशेष शिक्षकांची कार्यशाळा
दि 21 जुलै 2022 रोजी गोंदिया येथे दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्था,मतीमंद प्रवर्गातील शाळांचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षा अभियान मध्ये कार्यरत विशेष शिक्षकांची कार्यशाळा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन गोंदिया येथे आयोजित करण्यात आले होते. याचे आयोजन समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद गोंदिया , स्नॅक महाराष्ट्र, आणि सक्षम गोंदिया जिल्हा यांनी केले होते. या कार्यशाळेचा विषय राष्ट्रीय न्यास चा उद्देश व दिव्यांगासाठीच्या योजना. कार्यशाळेच्या अध्यक्ष स्थानी समाजकल्याण सभापती श्रीमती पूजा सेठ व मार्गदर्शक म्हणून महिला बालकल्याण उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा समाजकल्याण अधिकारी श्री संजय गंगने, सक्षम चे विदर्भ प्रांत संघटन मंत्री श्री आशुतोषजी , स्नॅक चे समन्वयक श्री. व्यंकट लामजने, सक्षम चे गोंदिया जिल्हा अध्यक्ष अस्थि शल्यचिकित्सक डॉ. प्रभाकर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता श्रीमती वैशाली तायडे आणि सक्षम चे जितु अग्रवाल हे उपस्थित होते.