संवेदना बहुविकलांग मुलांच्या शाळेमध्ये जागतिक योग दिन साजरा
संवेदना बहुविकलांग मुलांच्या शाळेमध्ये जागतिक योग दिन साजरा
संवेदना बहुविकलांग मुलांची शाळा, हरंगुळ (बु) लातूर येथे आज दि. 21 जून रोजी जागतिक योग दिनानिमित्त बहुविकलांग विद्यार्थ्यांसाठी योग शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 60 बहुविकलांग विद्यार्थी व पालक यांनी सहभाग घेतला. जनकल्याण निवासी विद्यालयातील शिक्षिका सौ. माधुरी आंतरकर यांनी दिव्यांग विद्यार्थ्य़ांकडून विविध योग करुन घेतले. जागतिक योग दिनाची माहिती संवेदना प्रकल्पातील फिजीओथेरपीस्ट सौ. मयुरी बिल्लावार यांनी दिली. मुख्याध्यापिका सौ.दीपा पाटील यांच्यासह थेरपीस्ट, विशेष शिक्षक, कर्मचारी यांची शिबीरामध्ये उपस्थिती होती.