जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर येथे जागतिक ऑटिझम स्वमग्नता दिवस साजरा करण्यात आला
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर येथे जागतिक ऑटिझम स्वमग्नता दिवस साजरा करण्यात आला
आज दिनांक ०२/०४/२०२२ रोजी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर येथे जागतिक ( ऑटिझम) स्वमग्नता दिवस साजरा करण्यात आला . यावेळी स्वमग्न मुलांवर वाचा उपचार पद्धतीने व भौतिक उपचार पद्धतीने उपचार करण्यात आले. सक्षम चे जिल्हा अध्यक्ष श्री डॉक्टर शिवाजी काळगे सर यांच्या हस्ते स्वमग्न मुलांना खाऊ देण्यात येऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी बस्वराज पैके यांनी स्वमग्नता या विषयावर सविस्तर माहिती दिली. या निमित्ताने सक्षम घ्या वतीने लातूर परिसरातील गरजूवंत दिव्यांगजनांना राशन कीट वितरण करण्यात आले. यावेळी सक्षम देवगिरी प्रांत चे सचिव श्री श्रीराम शिंदे, जिल्हा सचिव दिपक क्षिरसागर, वाचा उपचार तज्ञ रत्न जाधव, भौतिक उपचार तज्ञ श्रेयस कुलकर्णी, योगेश्वर बुरांडे, सौ दिपाली देशमुख, अनुप दबडगावकर , शिवशंकर सुरवसे, दिव्यांगजन व त्यांचे पालक उपस्थित होते.