दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले
आज दि. 28 एप्रिल 2022 रोजी संवेदना प्रकल्प, हरंगुळ (बु) लातूर येथे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील शिबीरामध्ये तपासणीसाठी डॉ. देवाशिष रुईकर (न्युरोफिजीशियन), डॉ. गौरव सोमाणी (त्वचारोग तज्ञ), डॉ. अक्षय गील्डा (दंत चिकीत्सक),यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांची तपासणी केली. संवेदना प्रकल्प, जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र, नदी हत्तरगा ता.निलंगा, आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रातील नियमित फिजिओथेरापि घेणार्या दिव्यांगांची तपासणी झाली.या प्रसंगी क्लिनिकल सायकाॅलाॅजिस्ट श्री नितीन आळंदकर, संवेदना प्रकल्पाचे सहकार्यवाह डाॅ योगेश निटुरकर, शाळेतील सर्व शिक्षक , फिजिओथेरापिस्ट , पालक उपस्थित होते.