जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र नदी हत्तरगा येथे जागतिक डॉऊन सिंड्रोम डे (दिवस) साजरा करण्यात आला
जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र नदी हत्तरगा येथे जागतिक डॉऊन सिंड्रोम डे (दिवस) साजरा करण्यात आला
आज जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र नदी हत्तरगा येथे सकाळी ठीक १०.१५ वाजता जागतिक डॉऊन सिंड्रोम डे (दिवस) साजरा करण्यात आला या वेळी मा. श्री जनार्धन विधाते साहेब( उपविभागीय अधिकारी औसा) मा. सौ. अहिल्याताई गाठाळ माँडम (तहसीलदार औसा) ,मा.श्री काशिनाथ राजे , श्री डॉ अशोक पोतदार, किशनराव खोबरे ग्रामसेवक श्री अजित देशमुख. व्यापारी संघाचे अध्यक्ष श्री शरद भोसले व किल्लारी येथील व्यापारी व ग्रामस्थ व प्रकल्पातील कर्मचारी उपस्थित होते. या वेळी डॉ अशोक पोतदार यांनी डाँऊन सिंड्रोम या दिव्यांगत्वाची सविस्तर माहिती दिली. तसेच या विषयावर समाजात जनजागृती करण्यात यावी व अशा व्यक्तींना समावून घेऊन त्यांना प्रेम देणे आवश्यक असते असे सांगितले. या वेळी तहसीलदार यांनी शासनतर्फे राबवण्यात येणाऱ्या योजनेची तपशीलवार माहिती दिली.
यावेळी डाँऊन सिंड्रोम दिव्यांगत्व असलेल्या ओंकार ने सर्वांना सेवा देउन आपण ही समाजातील एक म्हत्वपुर्ण घटक असल्याचे दाखवून दिले. कार्यक्रमाचे शेवटी या विषयावर जनजागृती व प्रेम वाडावे म्हणून डाँऊन सिंड्रोम दिव्यांगत्वाचे प्रतिक असलेल्या निळ्या व पिवळ्या रंगाची फुगे आकाशात सोडून दिली.