गडचिरोली पोलीस प्रशासन, संवेदना प्रकल्प, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली पोलीस संकुल परिसरातील एकलव्य सभागृहात दिव्यांगांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
गडचिरोली पोलीस प्रशासन, संवेदना प्रकल्प, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली पोलीस संकुल परिसरातील एकलव्य सभागृहात दिव्यांगांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
गडचिरोली पोलीस प्रशासन, स्टेट नोडल एजन्सी सेंटर महाराष्ट्र राज्य संवेदना प्रकल्प, लातूर आणि आदर्श मित्रमंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली पोलीस संकुल परिसरातील एकलव्य सभागृहात दि. 27 जानेवारी 2022 रोजी दिव्यांगांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मा. गृहराज्यमंत्री ना.श्री. शंभुराजे देसाई, गडचिरोली परिक्षेत्राचे मा.पोलीस उपमहानिरीक्षक श्री. संदिप पाटील, मा.पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल यांच्या हस्ते नक्षलग्रस्त दिव्यांग बंधु - भगिनींना व्हील चेअर, स्टीक आणि बेरोजगारांना शिलाई मशीन, मधुमक्षिका पालन सेट इ. साहित्याचे वितरण करण्यात आले.