दि. 30 जानेवारी 2022 रोजी जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन आहे. यानिमीत्ताने लातूर येथील महात्मा गांधी कुष्ठधाम वस्ती येथे राशन कीट वितरण करण्यात आले. मातोश्री वृद्धाश्रम, सक्षम देवगिरी प्रांत व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर यांच्या सहाय्याने हे राशन कीट 37 कुटुंबाना देण्यात आले. प्रसंगी महात्मा गांधी कुष्ठधाम येथील श्री. श्रीपती कांबळे, सक्षम देवगिरी प्रांत कोषाध्यक्ष डॉ.भगवानराव देशमुख, जिल्हा दिव्यांग पुनर्वन केंद्र, लातूरचे श्री. सुरज बाजुळगे, श्री.व्यंकट लामजणे, श्री. योगेश्वर बुरांडे, श्री. बस्वराज पैके, नागरिक यांची उपस्थिती होती.