प्रजासत्ताक दिनानिमीत्त संवेदना शाळेमध्ये मा. जिल्हा संघचालक श्री. संजयजी अग्रवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
प्रजासत्ताक दिनानिमीत्त संवेदना शाळेमध्ये मा. जिल्हा संघचालक श्री. संजयजी अग्रवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
आज मंगळवार दि. 26 जानेवारी 2021 रोजी प्रजासत्ताक दिनानिमीत्त संवेदना शाळेमध्ये मा. जिल्हा संघचालक श्री. संजयजी अग्रवाल यांच्या हस्ते सकाळी ठिक 8.10 वाजता ध्वजारोहण संपन्न झाले. ध्वजारोहणापुर्वी भारताच्या संविधानामधील उद्देशिकेचे वाचन विशेष शिक्षिका सौ. जयश्री माने यांनी केले. ध्वजारोहण कार्यक्रमास प्रकल्प अध्यक्ष डॉ. राजेशजी पाटील, प्रांत सहकार्यवाह श्री. अरुणराव डंके, प्रकल्प कार्यवाह श्री. सुरेश पाटील, कोषाध्यक्ष श्री. शाम भराडीया, प्रकल्प समिती सदस्य श्री. रत्नदीप बोटवे, सौ. अश्विनी लातूरे, मुख्याध्यापिका सौ. दीपाताई पाटील यांच्यासह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांची उपस्थिती होती.