दि. 21 मार्च हा जागतिक डाऊन सिंड्रोम दिन म्हणून साजरा केला जातो. स्टेट नोडल एजन्सी सेंटर, महाराष्ट्र राज्य व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र - संवेदना प्रकल्प, लातूर यांच्या वतीने जागतिक डाऊन सिंड्रोम दिन साजरा करण्यात आला. दि. 20 मार्च रोजी होमिओपँथीक महाविद्यालय, लातूर येथे डॉ. योगेश निटुरकर यांनी विद्यार्थ्यांसमोर डाऊन सिंड्रोम या विषयावर व्याख्यान दिले. आज दि. 21 मार्च रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित संख्य़ेत मुलांना ऑक्युपेशनल थेरपी देण्यात आली. पालकांना ऑक्युपेशनल थेरपीस्ट डॉ. रवि वट्टमवार यांनी मार्गदर्शन केले.
सर्व प्रथम डाऊन सिंड्रोम मुलांचे स्वागत करण्यात आले. मुलांनी भारत माता, सैनिक, विविध राज्यातील वेशभूषा परिधान करुन हा दिन साजरा करण्यात आला. या वेशभूषेमध्ये कु. वैष्णवी झरकर (भारतमाता) प्रथम क्रमांक, निखील कोल्हे (गुजराती वेश) द्वितीय, श्रीनिवास नलाबले (सैनिक) तृतीय तसेच फैज पठाण (वकील) व निदा मनियार यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
प्रसंगी प्रकल्प कार्यवाह श्री. सुरेश पाटील, सहकार्यवाह डॉ. योगेश निटुरकर, श्री. व्यंकट लामजणे यांची प्रमुख उपस्थिती होती. याकरिता विशेष शिक्षिका सौ. जयश्री माने, कु. प्रणिता क्षीरसागर, फिजीओथेरपीस्ट स्मिता मुंडे, श्री. बस्वराज पैके, श्री. अनुप दबडगावकर, आत्माराम पळसे यांनी परिश्रम घेतले.