*जागतिक स्वमग्नता जनजागरण दिवसानिमित्य जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर, च्या वतीने आज दि.4 एप्रिल 21 रोजी बुद्धिबाधित दिव्यांग मुलांची दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले.
*जागतिक स्वमग्नता जनजागरण दिवसानिमित्य जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर, च्या वतीने आज दि.4 एप्रिल 21 रोजी बुद्धिबाधित दिव्यांग मुलांची दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले.
*जागतिक स्वमग्नता जनजागरण दिवसानिमित्य* *स्टेट नोडल एजन्सी, महाराष्ट्र राज्य, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर, संवेदना प्रकल्पाच्या वतीने आज दि.4 एप्रिल 21 रोजी * बुद्धिबाधित दिव्यांग मुलांची दंत चिकित्सा* शिबिराचे आयोजन करण्यात आले. *प्रा. डॉ गणेश रमेश कोटलवार* (MDS) यांनी 15 बुद्धिबाधित (Intellectual Disability) दिव्यांग
मुलांच्या दातांची तपासणी व उपचार केला. स्वामी विवेकानंद यांची वेशभूषा केलेल्या चि. अनुप राठोड या स्वमग्न दिव्यांग मुलास पहिले पारीतोषिक डॉ कोटलवार यांच्या हस्ते देण्यात आले तसेच ह्यावेळी रेशन किटचे पण वितरण करण्यात आले. डॉ भगवान देशमुख यांनी प्रकल्पाचे वार्षिक अंक व डॉऊन सिंन्ड्रोम वरचा माहिती लेख डॉ कोटलवार यांना भेट दिला.
ह्या शिबिरासाठी डॉ योगेश निटूरकर, डॉ भगवान देशमुख, श्री व्यंकट लामजने, सौ जयश्री माने, श्री बस्वराज पैके, श्री अनुप दबडगावकर, श्री आत्माराम पळसे उपस्थित होते.