दिव्यांगा करिता लातूर महानगरपालिकेने दिव्यांगासाठी स्वतंत्र लसीकरणाची व्यवस्था
दिव्यांगा करिता लातूर महानगरपालिकेने दिव्यांगासाठी स्वतंत्र लसीकरणाची व्यवस्था
दि.17,18,19 मे 2021 रोजी 18 वर्षा वरील दिव्यांगा करिता लातूर महानगरपालिकेने दिव्यांगासाठी स्वतंत्र लसीकरणाची व्यवस्था केली आहे. या ठिकाणी लातूर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व संवेदना प्रकल्प यांच्या वतीने दिव्यांगाना ने-आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्था केली आहे. लसीकरण केंद्राच्या ठिकाणी पाणी, चहा, केळी व थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी मा. महापौर विक्रांत गोजमगुंडे, DDRC चे श्री बस्वराज पैके, श्री आत्माराम पळसे, श्री अनुप दबडगावकर आणि श्री किरण क्षीरसागर हे व्यवस्थे मध्ये होते.