गोकुळाष्टमी निमित्ताने संवेदना प्रकल्प येथे गोपाळ काल्याचा कार्यक्रम घेण्यात आला.
गोकुळाष्टमी निमित्ताने संवेदना प्रकल्प येथे गोपाळ काल्याचा कार्यक्रम घेण्यात आला.
आज दि. ३१/०८/२०२१ गोकुळाष्टमी निमित्ताने जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर अंमलबजावणी अभिकर्ता
रा स्व संघ जनकल्याण समिती ( महाराष्ट्र प्रांत) संचलित संवेदना प्रकल्प येथे गोपाळ काल्याचा कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी दिव्यांग मुलांनी आनंदाने सहभाग नोंदवला. यात कु. ऋतूजा चामले, कु. नभा कुलकर्णी, कु. मानवी पाटील, कु. सुहानी चिगुरी, चि. अथर्व पाठक, चि. वरद कुलकर्णी, इत्यादी नी मनोरा करून दहिहंडी फोडली. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रा तर्फे करण्यात आले. यावेळी डॉ. मयूरी बिल्लावार, सौ. जयश्री माने, श्री बस्वराज पैके, श्री अनूप दबडगावकर, श्री लक्ष्मण वाघमारे व श्रीमती राजनंदिनी सोनवणे उपस्थित होते. जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र (घरोदा) नदीहत्तरगा ता.निलंगा जि.लातूर येथे सुद्धा दहीहंडीचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी चि संकेत गिरी, दिप कदम, प्रथमेश हुलसुरकर, दिनेश माने, ओंकार धुमनसुरे, अवधूत जोशी ,मयुरेश रांगणेकर यांनी अतिशय उत्साही सहभाग घेतला. यावेळी पालक श्री रवींद्र रांगणेकर यांचाही सहभाग होता. कर्मचारी श्री सचिन जाधवर, कु भीमराव विभूते,सौ शोभा कुलकर्णी, सौ अर्चना पांचाळ यांची उपस्थिती होती.