माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त लायन्स क्लब लातूरचा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आदर्श शिक्षक सोहळा दिनांक ७ सप्टेंबर रोजी संवेदना प्रकल्प ,दिव्यांग पुनर्वसन केंद्र,हरंगुळ जि . लातूर येथे आयोजित करण्यात आला या सोहळ्यास आदर्श शिक्षिका म्हणून सौ. दीपाताई सुरेश पाटील मुख्याध्यपिका संवेदना प्रकल्प केंद्र,हरंगुळ, श्री. प्रशांत विनायकराव शिंदे सहशिक्षक ज्ञानप्रकाश बालविकास केंद्र लातूर व श्री. प्रमोद शिवराज हुडगे सहशिक्षक जि .प .प्रा. शाळा आटोळा ता. चाकूर यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल लायन्स आदर्श शिक्षक म्हणून शाल , श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले . या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री. संतोष जोशी सर अतिरिक्त कार्यकारी अधिकारी जि .प.लातूर तसेच लायन्स क्लब चे अध्यक्ष प्रा. सुधाकर जोशी , सचिव प्रा. पी. विवेकानंद ,कोषाध्यक्ष प्रा. अशोक पांचाळ , कॅबिनेट ऑफिसर प्रा. सतिश नरहरे , संचालक श्री. भारत माळवदकर , श्री. विशाल माळेगावकर ,सुदर्शन कंजे व , संवेदना प्रकल्पचे कार्यवाह श्री. सुरेशदादा पाटील , ज्ञानप्रकाश प्रक्लप च्या मुख्याध्यपिका सौ. सविताताई नरहरे तसेच लायन्स क्लब ज्ञानप्रकाश प्रक्लप व संवेदना प्रकल्पचे इतर पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्तित होते . सूत्र संचालन श्री. विशाल माळेगावकर तर आभार प्रदर्शन प्रा. अशोक पांचाळ यांनी केले .