लातूर जिल्ह्यातील सर्व जेष्ठ नागरीकांना राष्ट्रीय वयोश्री योजनेतून विशेष साहित्य देण्यात येणार
लातूर जिल्ह्यातील सर्व जेष्ठ नागरीकांना राष्ट्रीय वयोश्री योजनेतून विशेष साहित्य देण्यात येणार
लातूर जिल्ह्यातील सर्व जेष्ठ नागरीकांना राष्ट्रीय वयोश्री योजनेतून विशेष साहित्य देण्यात येणार
- श्री. राहुलजी केंद्रे, अध्यक्ष जिल्हा परिषद, लातूर
मागील वर्षी लातूर जिल्ह्यातील 8797 दिव्यांगांना अलीमको, जिल्हा परिषद लातूर व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर यांच्या वतीने घरपोच विशेष साहित्य वितरीत करण्यात आले आहे. तालुकानिहाय तपासणी शिबीर घेण्यात आले आहेत. लातूर जिल्हा परिषदेच्या वतीने या वर्षी राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व जेष्ठ नागरीकांना कानाचे मशीन, चष्मा, व्हील चेअर, स्टीक इत्यादी साहित्याचे वितरण करण्यात येणार असून तात्काळ अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. राहुलजी केंद्रे यांनी जाहीर केले. जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना आई वडील यांना सांभाळत नसतील तर 30 टक्के पगार कपात करुन ते त्यांच्या पालकांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगीतले. जागतिक जेष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून संवेदना प्रकल्प, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रम लातूर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी श्री राहुल केंद्रे बोलत होते. सदरील कार्यक्रमास समाजकल्याण विभागाचे सभापती श्री. रोहिदास वाघमारे व पंचायत समिती उदगीर चे उपसभापती श्री. बेंबडे यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमामध्ये मातोश्री वृद्धाश्रमास व्हील चेअर, कमोड चेअर संवेदना प्रकल्पाच्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर यांच्यामार्फत देण्यात आले.
कार्यक्रमात मातोश्री वृद्धाश्रमातील सर्व आजी आजोबांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संवेदना प्रकल्पाचे सहकार्यवाह श्री.डॉ. योगेश निटुरकर यांनी केले. कार्यक्रमास मातोश्री वृद्धाश्रमाचे कार्यवाह श्री. गंगाधर खेडकर यांनी प्रकल्पाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. व्यंकट लामजणे यांनी केले तर आभार श्री.डॉ. भगवानराव देशमुख यांनी मानले. कार्यक्रमास संवेदना प्रकल्प जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रामधील फिजिओथेरापिस्ट डॉ. मयुरी बिल्लावार,संगीत शिक्षक श्री योगेश्वर बुरांडे, विशेष शिक्षिका सौ जयश्री माने, डीडीआरसी चे श्री बस्वराज पैके मातोश्री वृद्धाश्रमातील सर्व कार्यकर्ते, आजी आजोबा यांची उपस्थिती होती.