दिव्यांगांना उच्च शिक्षणाची सोय करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार...
दिव्यांगांना उच्च शिक्षणाची सोय करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार...
दिव्यांगांना उच्च शिक्षणाची सोय करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार...
- मा. आमदार विक्रमजी काळे, शिक्षक आमदार
आज दि. 3 ऑक्टोबर 2021 रोजी रा.स्व.संघ जनकल्याण समिती संचलित संवेदना प्रकल्पाच्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र (डीडीआरसी), लातूर च्या वतीने जिल्ह्यामध्ये दोन ठिकाणी डीडीआरसी, लातूर व जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र, नदी हत्तरगा ता.निलंगा येथे राष्ट्रीय सेरेब्रल पाल्सी दिनानिमीत्त दिव्यांगांसाठी वैद्यकीय तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीराचे उदघाटन मा. आमदार श्री. विक्रमजी काळे यांच्या हस्ते झाले. शिबीरामध्ये तपासणी करण्यासाठी डॉ. देवाशिष रुईकर, न्युरोफिजीशियन यांची डीडीआरसी लातूर येथे तर डॉ.श्री. निलेश नागरगोजे न्युरोफिजिशियन यांची जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र, नदी हत्तरगा येथे वैद्यकीय तपासनी करण्यात आली.
ऋषी अष्टावक्रांच्या प्रतिमेचे पुजन करुन शिबीराचे उदघाटन करण्यात आले. प्रसंगी बोलताना आमदार श्री. विक्रमजी काळे म्हणाले की, देशामधील दिव्यांग क्षेत्रामध्ये सर्वोत्तम कार्य करणाऱ्या संस्थांपैकी संवेदना प्रकल्प ही संस्था लातूर येथे आहे याचा शिक्षक आमदार म्हणून मला आभिमान वाटतो व संवेदना प्रकल्पासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार आहे अशी ग्वाही प्रसंगी दिली. सेरेब्रल पाल्सी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी संवेदना प्रकल्पाची मागणी शासनाकडे मांडणार आहे. तसेच संवेदना प्रकल्पास संगणक खरेदी करिता आमदार निधीतून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संवेदना प्रकल्पाचे सहकार्यवाह डॉ.श्री. योगेश निटुरकर यांनी केले. संवेदना शाळेतील सेरेब्रल पाल्सी विद्यार्थीनी कु. राधिका पाठक व कु. वैष्णवी गोणे यांनी इयत्ता दहावीमध्ये अनुक्रमे 86 व 84 टक्के गुण घेवून यश संपादन केल्याबद्दल आमदार महोदयांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला तसेच या यशाबद्दल पालक व संवेदनाच्या मुख्याध्यापिका सौ. दीपाताई पाटील यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. नदी हत्तरगा येथे संवेदनाचे प्रकल्प कार्यवाह श्री. सुरेशदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामीण भागातील बौद्धिक दिव्यांग, सेरेब्रल पाल्सी व्यक्तींकरिता विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याने पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. व्यंकट लामजणे यांनी केले तर आभार सौ. जयश्री माने यांनी मानले. राष्ट्रीय सेरेब्रल पाल्सी दिनाचे महत्व श्री. बस्वराज पैके यांनी विषद केले. कार्यक्रमास विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा.डॉ. अशोक मोटे, प्रा.डॉ. मच्छिंद्र खंडागळे, प्रा. आरडले व श्री. भाऊसाहेब लाकाळ, सक्षमचे कोषाध्यक्ष डॉ. भगवानराव देशमुख, फिजीओथेरपीस्ट डॉ. मयुरी बिल्लावार, ऑक्युपेशनल थेरपीस्ट, कु.निकीता फड, संगीत शिक्षक श्री. योगेश्वर बुरांडे, श्री. सचिन राऊत, पालक व अन्य कर्मचारी यांची उपस्थिती होती.