मानसिक आरोग्य योजनेअंतर्गत घरोंदा प्रकल्प नदीहत्तरगा येथे प्रशिक्षण संपन्न
मानसिक आरोग्य योजनेअंतर्गत घरोंदा प्रकल्प नदीहत्तरगा येथे प्रशिक्षण संपन्न
जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालय, लातूर व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र, किल्लारी स.सा. कारख्यान्याच्या पाठीमागे, नदी हत्तरगा ता.निलंगा येथे मानसिक आरोग्य योजनेअंतर्गत आज दि. 8 ऑक्टोबर 2021 रोजी पालक, विशेष शिक्षकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ग्रामीण रुग्णालय, किल्लारी येथील वैद्यकीय अधिकारी स्रीरोगतज्ञ डॉ. दोडके, घरोंदा केंद्राचे अध्यक्ष श्री.डॉ. अशोक पोतदार, संवेदना प्रकल्पाचे कार्यवाह श्री. सुरेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हे प्रशिक्षण संपन्न झाले. जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाच्या प्रमुख सायकॉलॉजीस्ट श्रीमती सरिता शेंडे यांनी मानसिक स्वास्थ्य निकोप राहण्यासाठी मुलभूत बाबींची माहिती विषद केली. शेतकरी आत्महत्या, दिव्यांग व्यक्ती, दिव्यांगांचे पालक, विशेष शिक्षक यांच्यासमोर मानसोपचाराचे महत्व विषद केले. रिलँक्सेशन थेरपीचे प्रात्यक्षिक यावेळी घेण्यात आले. डॉ. दोडके यांनी वैद्यकीय दृष्ट्या उपयुक्त माहिती सांगीतली. श्री प्रकाश बोबडे, सायकॉलॉजीस्ट जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालय यांनी व्यसनमुक्ती साठी करावयाचे विविध उपक्रम यावेळी सांगण्यात आले. श्री. सतिष दोडतले समुपदेशक यांनीही समयोचित विषयावरती मार्गदर्शन केले. संवेदना प्रकल्पाच्या विविध उपक्रमांची माहिती व जनकल्याण समिती संस्थेचा परिचय प्रकल्प कार्यवाह श्री. सुरेश पाटील यांनी करुन दिला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रकट श्री. व्यंकट लामजणे यांनी केले. प्रशिक्षणास विशेष शिक्षक, पालक, यांची उपस्थिती होती.