वृक्ष प्रतिष्ठान लातुर यांच्याकडून जनकल्याण दिव्यांग केंद्र, भारत माता मंदिर नदिहात्तरगा ,येथे वृक्षारोपण
वृक्ष प्रतिष्ठान लातुर यांच्याकडून जनकल्याण दिव्यांग केंद्र, भारत माता मंदिर नदिहात्तरगा ,येथे वृक्षारोपण
वृक्ष प्रतिष्ठान लातुर यांच्याकडून जनकल्याण दिव्यांग केंद्र, भारत माता मंदिर नदिहात्तरगा ,येथे वृक्षारोपण रविवार दि.17 आॅक्टो.2021 रोजी लातुर येथील वृक्षप्रतिष्ठाण यांच्या कडून दिव्यांग व्यक्तीकरीता चालणार्या भारत माता मंदिर नदिहात्तरगा ता.निलंगा जि.लातुर (किल्लारी स.सा. कारखाना मागे) येथील जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्रात पेरू, चिक्कु,केशर आंबा,नारळ या फळांची रोपे लावण्यात आली. वृक्ष प्रतिष्ठानचे श्री अनिल वारद, सौ.सुनंदा जगताप,सौ.प्रतिभा गोमचाळे,संवेदना प्रकल्प कार्यवाह श्री सुरेश पाटील, जनता विद्यालयातील ज्येष्ठ निवृत्त शिक्षक श्री विश्वनाथ होळकुंदे,श्रीमती अनिता देशपांडे, श्री व्यंकट लामजणे, घरोंदाचे गृहपाल श्री सचिन जाधवर, प्रा.हेमंत वडणे,आदित्य शास्री,राम मुळे,अरिहत किवडे,चंद्रकांत शिंदे, देवानंद देशपांडे, श्रेयस सातपुते,आर्यन रामढव यांचे योगदान होते. प्रकल्पाच्या परिसरात प्रचंड पाऊस पडून गेला होता,अवती भवती पाणी साचले होते. सर्वजण चिखलातच खोदकाम करणे,शेणखत टाकुन रोपांची लागवड करण्याचा आनंद घेत होते. दिव्यांग मुले व प्रकल्पातील कर्मचारी यांनी वृक्ष प्रतिष्ठाणचे स्वागत आणि आभार प्रगट केले