गट साधन केंद्र, रेणापूर येथे UDID रजिस्ट्रेशन (स्वावलंबन कार्ड) व निरामय योजना विशेष नोंदणी शिबिर घेण्यात आले,
गट साधन केंद्र, रेणापूर येथे UDID रजिस्ट्रेशन (स्वावलंबन कार्ड) व निरामय योजना विशेष नोंदणी शिबिर घेण्यात आले,
आज दिनांक 2/12/2021 रोजी गट साधन केंद्र, रेणापूर येथे UDID रजिस्ट्रेशन (स्वावलंबन कार्ड) व निरामय योजना विशेष नोंदणी शिबिर घेण्यात आले,संवेदना प्रकल्पाचे स्पीच थेरपीस्ट श्री.बुरांडे सर, कार्यालय सहाय्यक श्री. आदर्श भस्मे तालुक्यातील सर्व साधनव्यक्ती,सर्व विशेष तज्ञ,आणि सर्व विशेष शिक्षक उपस्थित* होते,शिबिरासाठी आलेले सेवितजन व पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्यक्ष नोंदणीला सुरुवात झाली.शिबिरात एकूण 102 दिव्यांग विद्यार्थी व पालक उपस्थित होते त्यापैकी 90 नवीन मुलांचे UDID रजिस्ट्रेशन झाले व 12 निरामय योजना लाभार्थ्यांचे रजिस्ट्रेशन झाले. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या सहकार्याने हे शिबीर संपन्न झाले.
जागतिक दिव्यांग दिनानिमीत्त
तालुकाश: शिबीराचे आयोजन
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, मुरुड यांच्या संयुक्त विद्यमाने शिबाराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबीरामध्ये लातूर जिल्ह्यातील पूर्व प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या दिव्यांगांना युडीआयडी कार्ड काढणे, विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी हे आवश्यक आहे. बौद्धिक दृष्ट्या दिव्यांगांकरिता निरामय आरोग्य विमा योजनेचे कार्ड काढणे व विमा योजनेचा लाभ प्राप्त करुन घेण्याची माहिती या शिबीरात देण्यात येत आहे. हे शिबीर दि. 22 नोव्हेंबर 2021 ते 5 डिसेंबर 2021 पर्यंत चालणार आहे.
दि. 22 नोव्हेंबर – अहमदपूर, 23 नोव्हेंबर - औसा, 24 नोव्हेंबर -चाकूर, 25 नोव्हेंबर -देवणी, 26 नोव्हेंबर -लातूर, 29 नोव्हेंबर -जळकोट, 30 नोव्हेंबर -निलंगा, 1 डिसेंबर – शिरुर अनंतपाळ, 2 डिसेंबर- रेणापूर व जागतिक दिव्यांग दिनी दि. 3 डिसेंबर रोजी होणार आहे.