संवेदना लातूर वेबसाईट अद्ययावतीकरण करिता ग्रामसेवक प्रशिक्षण व दिव्यांगांकरिता सगंणक प्रशिक्षणाचे उदघाटन
संवेदना लातूर वेबसाईट अद्ययावतीकरण करिता ग्रामसेवक प्रशिक्षण व दिव्यांगांकरिता सगंणक प्रशिक्षणाचे उदघाटन
संवेदना लातूर वेबसाईट अद्ययावतीकरण करिता ग्रामसेवक प्रशिक्षण व दिव्यांगांकरिता सगंणक प्रशिक्षणाचे उदघाटन
दि. 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनाच्या निमीत्ताने संवेदना प्रकल्प हरंगुळ (बु) येथे जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष श्री. राहुलभैया केंद्रे यांच्या हस्ते प्रशिक्षणाचे उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी श्री. राहुल केंद्रे म्हणाले की, माझ्या जिल्हा परिषदेच्या कालावधीत सर्वात अधिक आणि परिणामकारक दिव्यांगांकारिता कार्य करण्याची संधी मिळाली याचा मला मनापासून आनंद होतो. संवेदना प्रकल्पामुळे दिव्यांग क्षेत्रात कार्य करण्याची प्रेरणा मिळाली.
जिल्हा कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त श्री. मरे साहेब म्हणाले की, दिव्यांगांकरिता संगणक प्रशिक्षणाची स्वतंत्र बँच महाराष्ट्रात पहिल्यांदाच आस्था केशवराज केंद्र, लातूर येथे प्रशिक्षण होत आहे. ही माझ्या दृष्टीने महत्वाची बाब आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह श्री. नितीनभाऊ शेटे, जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाचे सभापती श्री. रोहिदास वाघमारे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्री.सुनिल खमितकर, सहायक गटविकास अधिकारी, पंचायत समिती लातूर, लिड बँकेचे मँनेजर श्री. अनंत कसबे, संवेदना प्रकल्पाचे कार्यवाह श्री. सुरेशदादा पाटील यांचे प्रसंगोचित मार्गदर्शन झाले.
या कार्यक्रमासाठी लातूर तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, संगणक प्रशिक्षण घेणारे दिव्यांग बंधु भगिनी उपस्थित होते. जागतिक दिव्यांग दिनाच्या कार्यक्रमामध्ये संघाचे मा. शहर संघचालक प्रा.श्री. राजेश्वर बेंबडे, संवेदना प्रकल्प समितीचे कोषाध्यक्ष श्री. शाम भराडिया, सहकार्यवाह डॉ. योगेश निटुरकर, सक्षमचे प्रा. भगवान देशमुख, श्री. श्रीराम शिंदे, विशेष शिक्षक, पालक, दिव्यांगांच्या विविध संघटनांचे पदाधिकारी यांची उपस्थिती लक्षणीय होती.
वेबसाईटची तांत्रिक माहिती श्री. व्यंकट लामजणे यांनी दिली. फिजीओथेरपीस्ट मयुरी बिल्लावार यांनी दिव्यांगांचे प्रकार विषद केले. डॉ. योगेश निटुरकर यांनी आभार व्यक्त केले