दिव्यांग विद्यार्थ्यांच्या संगणक प्रशिक्षणास प्रारंभ !!!!!!
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या संगणक प्रशिक्षणास प्रारंभ !!!!!!
आज दि. 13 डिसेंबर 2021 रोजी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व आस्था कौशल्य विकास केंद्र, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांकरिता विशेष संगणक प्रशिक्षण सत्रास सुरुवात झाली. प्रशिक्षण सत्राच्या पहिल्या दिवशी सर्व दिव्यांगांचे स्वागत करण्यात आले. दिव्यांगांचे निवास, भोजन व जाण्या-येण्याची व्यवस्था जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र- संवेदना प्रकल्प यांच्या वतीने करण्यात आली आहे. प्रसंगी आस्था कौशल्य विकास संस्थेचे प्राचार्य श्री. उमेश गाडे, संवेदना प्रकल्पाचे श्री. व्यंकट लामजणे, श्री. योगेश बुरांडे, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे श्री. बस्वराज पैके, आस्था केंद्राचे समन्वयक श्री. गायकवाड, दिव्यांग बंधु – भगिनी यांची उपस्थिती होती.